x
A A M I P A R I V A R G L O B A L

आमी परिवार ग्लोबल

अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स परिवार

You can make a difference today!

#
#

आमी परिवार ग्लोबल काय करतो?

परदेशात राहणाऱ्या किंवा कोणत्याही परदेशात प्रवास करत असलेल्या आपल्या मराठी बांधवास कोणत्याही प्रकारची मदत उपलब्ध करून देणे.पोस्ट केली जाते.

#
#

आमी परिवार ग्लोबल ला का निवडावे?

परदेशात लागणाऱ्या कोणत्याही मदतीसाठी आमी परिवार ग्लोबल सदैव तुमच्या
सोबत राहतो.पणे दिल्या.

#
#

आमी परिवार ग्लोबल चे ध्येय

परदेशात राहणाऱ्या प्रत्येक मराठी व्यक्तीला एकत्रित जोडून ठेवणे.वून देणे.


#
संस्थापक मनोगत
जगभरातील मराठी बांधवांचा ऐक्याचा झेंडा "आमी परिवार ग्लोबल" च्या माध्यमातून दहा हजारांपेक्षा अधिक मराठी बांधव एकत्र जोडले गेले आहेत.

‘मराठी लोक मराठी लोकांचेच पाय ओढतात’ ही समजूत आत्ता ‘आमी परिवार ग्लोबल’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करणाऱ्या सोशल ग्रुपने खोडून काढली आहे.

अमेरिका, कॅनडा, यूके, केनिया, जॉर्जिया, इजिप्त,अरब राष्ट्रांमधील दुबई, अबुधाबी, शारजाह, अजमान, रस अल खैमाह, अल ऐन, फुजेराह, उम अल क्वेन, तसेच कतार, बहारीन, सौदी अरेबिया, ओमान या आखाती देशांमध्ये नोकरी-धंद्यानिमित्त जेव्हा आपले मराठी बांधव येतात तेव्हा योग्य मार्गदर्शनाअभावी त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच कित्येक होतकरू मराठी तरुण, परदेशातील नोकरीपर्यंत पोहचू शकत नाहीत.

ही सर्व परिस्थिती पाहता ‘आपल्या मराठी बांधवांसाठी काहीतरी करायला हवं’ असा विचार सतत माझ्या मनात घोळत होता. अणि अशातच मी दुबईमध्ये नोकरीस असताना एकेदिवशी मला, आपण व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या परदेशस्थ मराठी बांधवांना समाजप्रेमाच्या एका धाग्याने गुंफू शकतो, ही कल्पना सुचली अन् २९ मार्च २०१६ रोजी 'आमी परिवार ग्लोबल' चा पहिला व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला. आणि बघता बघता दोन वर्षात ह्या इवल्याशा रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले.



श्री. संतोष कारंडे,
संस्थापक, आमी परिवार.
#
#
Our Support Team

Who are always helpful

#

Mr. Santosh Karande

Founder & Chairman

#

Revati Karande

Co Founder